
भारताच्या कठोर निर्णयांनी आतंकवाद्यांचा सुपडा साफ होणार ?
या निर्णयांमुळे पाकिस्तानवर व्यापक परिणाम होणार आहेत. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आपल्या सिंचित क्षेत्राच्या सुमारे 80 टक्के भागासाठी सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्ध्वस्त होऊन अन्नसंकट आणि वीजटंचाई निर्माण होऊ शकते. तुर्बेला, मंगला आणि चष्मा यांसारखी प्रमुख धरणे या नद्यांवर असल्याने वीज निर्मितीवर देखील मोठा परिणाम होईल. यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे.