
काँग्रेस ला मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश म्हणजे केवळ एका नेत्याचे पक्षांतर नाही, तर पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वासाठी गंभीर आव्हान आहे. भोरसारखा पारंपरिक काँग्रेस गड जर भाजपच्या खात्यात गेला, तर या जिल्ह्यात राजकीय समीकरणं पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. पुढील काळात थोपटे यांचा राजकीय प्रवास काय वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.