आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

भारताच्या कठोर निर्णयांनी आतंकवाद्यांचा सुपडा साफ होणार ?

या निर्णयांमुळे पाकिस्तानवर व्यापक परिणाम होणार आहेत. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आपल्या सिंचित क्षेत्राच्या सुमारे 80 टक्के भागासाठी सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्ध्वस्त होऊन अन्नसंकट आणि वीजटंचाई निर्माण होऊ शकते. तुर्बेला, मंगला आणि चष्मा यांसारखी प्रमुख धरणे या नद्यांवर असल्याने वीज निर्मितीवर देखील मोठा परिणाम होईल. यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Read More »
आंतरराष्ट्रीय

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर येण्यास आणखीन विलंब ?

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर हे गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. या दोघांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू-10 मोहिमेची योजना तयार केली गेली होती, ज्यात या दोघांच्या जागी 4 नवीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवले जाणार होते. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे क्रू-10 मोहिमेचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे.

Read More »
आंतरराष्ट्रीय

भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या स्थानी ?

CPI २०२४ ने जगभरातील भ्रष्टाचाराची स्थिती स्पष्ट केली आहे. डेनमार्क आणि इतर स्कॅन्डिनेव्हियन देशांचे राज्य प्रशासन आणि पारदर्शकतेच्या बाबतीत मोठे आदर्श आहेत. याउलट, सूडान आणि सोमालियासारख्या देशांना गंभीर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भारत ९६ व्या स्थानावर असलेली स्थिती नक्कीच चांगली नाही.

Read More »
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेने दाखवली भारतीयांना घरची वाट ? काय आहे प्रकरण ?

अमेरिकेने १०४ भारतीय नागरिकांना लष्करी विमानाद्वारे अमृतसरमध्ये आणून सोडले, परंतु त्यांच्याशी झालेल्या अमानवी वागणुकीवर आणि लष्करी विमानाचा वापर करून त्यांना परत पाठवण्याच्या धोरणावर केंद्र सरकारकडून कोणताही निषेध व्यक्त केला गेला नाही. उलट, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य साकेत गोखले यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या धोरणावर टीका करत, ते अमेरिकेच्या स्थलांतरितांना बेड्या घालण्याच्या धोरणाचे समर्थन करत असल्याचे म्हटले.

Read More »
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तान च्या माजी पंतप्रधानांना जन्मठेपेची शिक्षा. काय आहे प्रकरण ?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना आणखी एक मोठी शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे.

Read More »
Scroll to Top