थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी…! दोन्ही शिवसेना आमने सामने ?

एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामराची टिप्पणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे विनोदी कलाकार कुणाल कामरा अडचणीत आले आहेत. मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३(१)(ब), ३५३(२) आणि ३५६(२) अंतर्गत कुणाल कामरा विरोधात कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कुणाल कामराची राजकारणावर टीका

कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यात कामरा म्हणाले होते, “शिवसेना भाजपमधून बाहेर पडली, नंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली, आणि एनसीपीतून एनसीपी बाहेर पडली. एका मतदाराला नऊ बटणं दिली, आणि त्यामुळे सगळे कन्फ्युज झाले.” यावरून शिंदे गटावर हल्ला करत त्याने शाहरुख खानच्या गाण्याच्या चालीवर एक नवं गाणं तयार केलं, ज्यात शिंदे यांना ‘दलबदलू’ आणि ‘गद्दार’ असे संबोधले. त्याच्या गाण्यात शिंदे यांचं राजकारण आणि त्यांची भूमिका चांगलीच कमी केली आहे.

शिंदे यांच्यावर टिप्पणी करणारे गाणे

“थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखों में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है,” अशा शब्दात त्याने गाण्यात शिंदे यांना लक्ष्य केले. यावरून शिंदे समर्थक नाराज झाले आणि त्यांनी कामराच्या विरोधात कारवाईची मागणी केली.

हॅबिटॅट कॉमेडी क्लबमधील तोडफोड

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमधील या घटनेनंतर शिवसेना नेते राहुल कनाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल कनाल आणि सुमारे ४० जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुरजी पटेल यांची कारवाईची मागणी

शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे आणि त्यांना तात्काळ एकनाथ शिंदे यांची माफी मागण्याची मागणी केली आहे. पटेल यांनी सांगितले की, जर कामरा दोन दिवसांत माफी मागितली नाही, तर शिवसैनिक त्यांना मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी फिरू देणार नाहीत. याचप्रमाणे, शिवसेना नेत्या कार्यकर्त्यांनी कामराविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी कामरा विरोधात इशारा

त्याचबरोबर, पटेल यांनी इशाराही दिला की, जर कुणाल कामरा सार्वजनिक ठिकाणी दिसला, तर त्याचे तोंड काळे करण्याची धमकी दिली आहे. तसेच, हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याची आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली.

कामराचा ‘देशद्रोही’ आरोप

कुणाल कामरा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते आणि त्यावर टीका केली होती. शिंदे यांच्या विरोधात कामरा यांनी बॉलिवूड गाण्याच्या चालीवर केलेली टिप्पणी शिवसेनेच्या नेत्यांना आवडली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top