प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया ने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात समर रैनाच्या संकल्पनेवर अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि आसाममध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे आयोजक, रणवीर, अपूर्वा मखीजा आणि समर रैनाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यावर चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आपण या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती घेऊयात.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचे स्वरूप
‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे ज्यामध्ये स्पर्धकांना त्यांच्या अनोख्या कौशल्यांचा प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ दिलं जातं. या शोमध्ये कविता, जादू, विनोद, गायन, नृत्य इत्यादी कौशल्यांचा समावेश असतो. कार्यक्रमात, प्रत्येक भागात नवीन परीक्षकांचा पॅनेल असतो, ज्यामुळे प्रत्येक एपिसोड वेगवेगळा असतो.
स्पर्धकांची मूल्यांकन प्रणाली
स्पर्धकांना ९० सेकंदांचा वेळ दिला जातो ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करायचे असते. त्यानंतर, परीक्षकांनी दिलेले गुण स्पर्धकाच्या अंदाजाशी जुळल्यास तो स्पर्धक विजेता ठरतो. विजेत्याला तिकिट विक्रीच्या उत्पन्नाच्या रुपात बक्षिस दिलं जातं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्पर्धकांच्या आत्म-जागरूकतेचा आणि विश्वासाचा परीक्षण करण्याचा आहे.
रणवीरच्या वादग्रस्त प्रश्नावर देशभरातुन संताप
स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्या नवतरुणांना संधी देणाऱ्या समय रैनाच्या युट्यूब चॅनलवरील वेबकास्ट कार्यक्रमात रणवीर अलाहबादिया पाहुणा परीक्षक म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमात रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला, ज्यामुळे देशभरातून संताप व्यक्त झाला. रणवीरने त्याला विचारले, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर *** करताना पाहायला आवडेल की त्यामध्ये सहभागी होऊन हा प्रकार कायमचा संपवायला आवडेल?” या प्रश्नामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमठल्या.
गुन्हा दाखल झालेल्यांची माहिती
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ‘इंडियाज गॉट लेटंट’ शोमध्ये अश्लील माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया, कॉमेडियन समय रैना आणि 30 इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याआधी आसाम पोलिसांनी देखील याच दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
समाजाच्या प्रतिक्रिया आणि व्हायरल क्लिप
रणवीर अलाहबादिया, जो ‘बीअर बायसेप्स’ चॅनेलसाठी प्रसिद्ध आहे, त्याने शोमध्ये अत्यंत अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि देशभरातून त्याच्यावर टीका होऊ लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दुरूपयोगाचा मुद्दा उपस्थित झाला आहे, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील सामग्री प्रसारित करण्यावर तीव्र टीका केली गेली आहे. राजकीय नेत्यांनी, मानवाधिकार आयोगाने आणि महिला आयोगाने कार्यक्रमाच्या निंदा केली. मुंबई पोलीस देखील खार येथील स्टुडिओवर गेले. या गदारोळामुळे यूट्यूबने संबंधित व्हिडीओ हटवला आहे.
समय रैनाची पोस्ट आणि त्याची प्रतिक्रिया
समय रैनाने एक पोस्ट शेअर करत सांगितले की, “जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी माझ्या चॅनलवरील ‘इंडियाज गॉट लेटंट’ चे सर्व व्हिडीओ काढून टाकले आहेत. माझा उद्देश फक्त लोकांना हसवणे आणि मजा करणे होता. मी यासंदर्भातील चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होण्यासाठी सर्व एजन्सींना पूर्ण सहकार्य करेन.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे समय रैनाची ही वादावर दिलेली पहिली प्रतिक्रिया ठरली आहे.