आदिवासींसाठी झटणाऱ्या नेत्याचे निधन…..

“आदिवासी विकासाचे ध्वजवाहक, राजकारणातील एक यशस्वी नेता : मधुकर पिचड”

आदिवासी नेता गमावल्याची खंत

महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असतानाच अकोले तालुक्यातून एक बातमी समोर आली. भाजपचे माजी मंत्री आणि आदिवासी नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. १५ ऑक्टोबर रोजी त्यांना ब्रेन स्टोकचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना नाशिक येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून ते एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होते, आणि आजाराशी झुंजत होते. परंतु त्यांच्या या झुंजीला काल, ६ डिसेंबर २०२४ रोजी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली, आणि ते आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या निधनावर भाजपसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला.

मधुकर पिचड यांचा प्रारंभिक जीवन आणि शिक्षण१९६१ मध्ये त्यांनी अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. १९७२ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यानंतर १९७२ ते १९८० दरम्यान पंचायत समिती सभापती म्हणून काम केले. १९८० पासून २००९ पर्यंत सलग सात वेळा अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि १९९५ ते १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले होते.
२०१४ मध्ये अकोले मतदारसंघात त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. २०१९ मध्ये पिचड यांनी आपल्या मुलासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या कार्यकाळात आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु संवर्धन यांसारख्या विविध मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली

मधुकर पिचड यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत श्रद्धांजली वाहिली. फडणवीस म्हणाले, “मधुकर पिचड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विशाल नेटवर्क उभे केले. आदिवासींच्या प्रश्नांसाठी ते कायम तत्पर असायचे आणि आर्थिक मागास वर्गासाठी त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या सुविधा निर्माण केल्या. आदिवासींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी पायाभरणी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण होते.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मधुकर पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी शोकसंदेशात म्हटले, “मधुकर पिचड यांनी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ प्रदीर्घ होता. या काळात त्यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी 35 वर्षे प्रतिनीधित्व केले.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top