महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देखील काही जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महायुतीचा उमेदवार मुख्यमंत्री होईल, हे नक्की झाले आहे. परंतु निकालानंतर सर्वांचं लक्ष मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नाकडे लागले आहे. अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यामुळे महायुतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्याला नाराजी नाही, हे दर्शवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. तथापि, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या इच्छेने शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणाऱ्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. याचप्रमाणे, अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे समन्वय साधत असल्याचे दिसून येते. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची अपेक्षा अनेक आमदारांनी मिडियासमोर व्यक्त केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या इतर नेत्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतील उच्च नेतृत्त्वानेच घेतला जाईल. त्यामुळे या सर्व चर्चांची गुप्तता राखली जात आहे, आणि गुप्त बैठका देखील चालू आहेत. तसेच भाजप कडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली जाईल कि अन्य कोणत्या नेत्यांची निवड होईल हे आगामी काळामध्ये समजेल. त्यानुसार, मुख्यमंत्री पदावर कोणत्या पक्षाचा आणि कोणता आमदार विराजमान होईल हे सांगणे कठीण आहे, कारण २०२२ मध्ये शिवसेनेची फुटीनंतर सर्वांना वाटत होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, परंतु अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून सर्व अंदाज चुकीचे ठरवले गेले.
एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्या कडे लागले होते. शिंदे यांनी म्हटले की, “मोदी आणि शाह जे ठरवतील, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल.” तसेच, महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जे ठरवले, ते आम्हाला मान्य असेल, असे ते म्हणाले. शिवसेना हा नाराज होऊन रडणारा पक्ष नाही, तर लढणारा पक्ष आहे, असे सांगून त्यांनी आपली नाराजी नाही, हे स्पष्ट केले. त्यानंतर, “आम्हाला अजून खूप काही करायचे आहे,” असे सांगून त्यांनी केंद्रामध्ये संधी असल्याची चर्चा सुरू केली. याबाबत, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील का, किंवा पक्षप्रमुखाच्या भूमिकेतून पक्ष वाढवण्याचे कार्य करतील, याचे उत्तर आगामी काळात कळेल. जर शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत, तर उपमुख्यमंत्री पदासाठी ते नवा पर्याय देतील, असे त्यांच्या पत्रकार परिषदेतून समजले.
शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच नागपूरमध्ये चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्याचा आभार व्यक्त केला. यामुळे सर्व गोष्टी अगोदरच नियोजनबद्धपणे केल्या जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, भाजपचा मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे. काही माध्यमांच्या हवाल्याने, दिल्लीमध्ये आज संध्याकाळी तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र भेटणार आहेत आणि या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. भाजपच्या सर्व नेत्यांनी यावर बोलणे टाळल्यामुळे या सर्व प्रक्रियेतील सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत, परंतु अजूनही भाजपला मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही, यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवून त्यांना मान मिळवून दिला जाईल की, त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहूनच समाधान मानावे लागेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रफुल्ल पटेल, अजित तटकरे यांसारख्या नेत्यांकडून दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती केली जात आहे, असे दिसते. यावर तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र येऊन कसा तोडगा काढतात, हे पुढील काळात समजेल.
तूर्तास एवढेच ……. !!!