
आंतरराष्ट्रीय
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर येण्यास आणखीन विलंब ?
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर हे गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. या दोघांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू-10 मोहिमेची योजना तयार केली गेली होती, ज्यात या दोघांच्या जागी 4 नवीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवले जाणार होते. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे क्रू-10 मोहिमेचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे.