
महाराष्ट्र
विरोधीपक्षनेते पदाच्या शर्यतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सरशी ?
भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेता होण्याची वाट आता बिकट होत आहे. महायुतीने भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास फारशी अनुकूलता दाखवली नाही आहे. दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के संख्याबळाच्या नियमावर बोट ठेवल्याचे दिसत आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता अधिक धूसर झाली आहे.