
आंतरराष्ट्रीय
अमेरिकेने दाखवली भारतीयांना घरची वाट ? काय आहे प्रकरण ?
अमेरिकेने १०४ भारतीय नागरिकांना लष्करी विमानाद्वारे अमृतसरमध्ये आणून सोडले, परंतु त्यांच्याशी झालेल्या अमानवी वागणुकीवर आणि लष्करी विमानाचा वापर करून त्यांना परत पाठवण्याच्या धोरणावर केंद्र सरकारकडून कोणताही निषेध व्यक्त केला गेला नाही. उलट, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य साकेत गोखले यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या धोरणावर टीका करत, ते अमेरिकेच्या स्थलांतरितांना बेड्या घालण्याच्या धोरणाचे समर्थन करत असल्याचे म्हटले.