महाराष्ट्रातील महायुतीच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असल्याने त्यासंबंधी बातम्या सर्वत्र चर्चिला होत्या. परंतु त्याचवेळी पंजाबमध्ये ३ डिसेंबर रोजी सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) प्रवेशद्वारावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली
कोण आहेत सुखबीरसिंग बादल?
सुखबीरसिंग बादल हे शिरोमणी अकाली दल चे नेते व पंजाब चे माजी उपमुख्यमंत्री आहेत. मागील एका वादात, पंजाब च्या शीख समुदायाच्या ‘सर्वोच्च न्यायालयाने’ म्हणजेच श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर बादल यांना शिक्षा सुनावली. २००७ ते २०१७ या काळात अकाली दल सरकारच्या काळात अनेक चूका झाल्या. यामध्ये धार्मिक चुकांसाठी जथेदार श्री अकाल तख्त यांनी बादल आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना शिक्षा सुनावली होती. तीच शिक्षा बादल घेत होते. या गोळीबारामध्ये ते जखमी झाले आहेत.सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्या ठिकाणी असणाऱ्या एका नागरिकाने तात्काळ गोळीबार करणाऱ्याला रोखले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे हल्ला रोखला
गोळीबार होत असताना तेथे उपस्थित नागरिकांनी जागरूकतेने गोळीबार करणाऱ्या तरुणाला रोखले, ज्यामुळे त्याच्या बंदूकीचा अंदाज चुकला आणि सुखबीरसिंग बादल सुरक्षित राहिले. गोळीबार करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला आणि त्याची बंदूक ताब्यात घेऊन जप्त केली. चौकशीदरम्यान, त्याने आपले नाव नारायण सिंह चौरा असे सांगितले. तसेच, पोलिस तपासात हेही उघडकीस आले की, हा युवक २ डिसेंबर रोजी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आले होते. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांचा आरोप खालसा दलावर
माध्यमांमध्ये असणाऱ्या बातम्यांनुसार, हा हल्ला राजकीय सुडापोटी केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला त्यांचा विरोधी खालसा दलाने केला असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये सांगितले. तसेच हल्लेखोर हा खालसा इंटरनॅशनल (BKI) चा माजी सदस्य आहे. तो १९८४ मध्ये पाकिस्तानात गेला होता व तेथून पंजाब मध्ये तो शस्त्रांची व स्फोटकांची तस्करी करत असल्याचे बोलले जाते.या आरोपीने गनिमी युद्धावर एक पुस्तक देखील लिहिले आहे. तसेच, बुडैल जेलब्रेक प्रकरणात तो आरोपी आहे आणि पंजाबच्या तुरुंगात त्याने शिक्षा भोगली आहे.
त्यामूळे शिरोमणी अकाली दलाने सुखबिरसिंग बादल यांना पुरेशी सुरक्षा दिली नसल्याने हा हल्ला झाला असल्याचे आरोप शिरोमणी अकाली दलाने पोलिसांवरती केले आहेत सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये आणखी कोणत्या गोष्टी उघड होतात, हे पुढील काळात समजेल.