महायुती मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश

महाराष्ट्रात महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या आधी झाला. ३३ वर्षानंतर नागपुरात हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार २१ डिसेंबर १९९१ रोजी नागपुरात पार पडला होता. त्यानंतर रविवारी फडणवीस सरकारचा मंत्री मंडळाचा विस्तार सुद्धा नागपुरात झाला.महायुतीचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी विविध पद्धतीने लॉबींग करत होते. तसेच काही आमदारांनी मीडिया सोबत बोलून आपल्या पक्षातील नेत्यांना विनंती केली होती. त्यानुसार, १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला.

भाजपाचे १९, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ९ अशा एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून, त्यामध्ये भाजपाचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये ३३ मंत्र्यांनी कॅबिनेट तर ६ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपाच्या ३, शिवसेनेच्या २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १ मंत्र्याला राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात तीनही पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याचे बोलले जात आहे. आज आपण मंत्रिमंडळातील नवीन चेहऱ्यांविषयी चर्चा करूया.

शिवेंद्रराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले हे २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ या पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप मध्ये प्रवेश केला होता आणि सध्या ते भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्यांचे वडील अभयसिंह राजे भोसले हे देखील आमदार होते. तसेच खासदार श्री उदयनराजे भोसले यांचे ते बंधू आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांना मोठ्या प्रमाणावर मानतो.

जयकुमार गोरे

जयकुमार गोरे हे २००९, २०१४, २०१९, २०२४ या सलग चार वेळा माण खटाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. जयकुमार गोरे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि ते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर व दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांचे ते जिवलग मित्र आहेत. तसेच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे माण खटावसारख्या दुष्काळी भागात ते मंत्रिपदामुळे कसे काम करतील, हे आगामी काळात समजेल.

नितेश राणे

नितेश राणे हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असून त्यांची स्वाभिमान संघटना नावाची एक पार्टी आहे, ज्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून २०१४, २०१९ व २०२४ मध्ये विजयी झाले आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि सध्या भाजप मध्ये झाला आहे. तसेच त्यांची ओळख एक प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून केली जाते. त्यांचे मंत्रिपद मिळाल्याबद्दल चर्चा सुरू आहे.

आकाश फुंडकर

आकाश फुंडकर हे भाजपचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते २०१४, २०१९ व २०२४ मध्ये विजयी झाले आहेत. त्यांच्या वडिलांचा, पांडुरंग फुंडकर यांचा भाजपमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव होता. पांडुरंग फुंडकर हे भाजपचे माजी अध्यक्ष, माजी खासदार व माजी आमदार होते. आकाश फुंडकर यांची ओळख देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून आहे. बुलढाणा जिल्ह्यात फुंडकर कुटुंबाला मोठा आधार आहे, त्यामुळे भाजपला इथे बळ मिळवण्यासाठी आकाश फुंडकर यांना मंत्रिपद दिले गेले असे बोलले जाते.

माधुरी मिसाळ

माधुरी मिसाळ या भाजपच्या निष्ठावान आमदार आहेत. त्या पार्वती विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४, २०१९ व २०२४ मध्ये सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची ओळख चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून आहे. त्यांचा राजकीय प्रवास भाजपमध्येच सुरु झाला आणि भाजपच्या सुरुवातीपासून निष्ठावान राहिल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आले. पार्वती मतदारसंघ पुणे शहरात असल्याने, चार वेळा निवडून येणे हे एक विक्रम ठरले आहे.

मेघना बोर्डीकर – साकोरे

मेघना बोर्डीकर – साकोरे या भाजपच्या आमदार आहेत. त्या २०१९ व २०२४ विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. त्यांच्या वडिलांचा, रामप्रसाद बोर्डीकर यांचा राजकीय वारसा होता. त्यांना मानणारा गट असल्याने त्यांचा फायदा मेघना बोर्डीकर यांना झाला. परभणी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांचे पती दीपक साकोरे हे IAS अधिकारी आहेत.

पंकज भोईर

पंकज भोईर हे वर्धा विधानसभेचे भाजप आमदार आहेत. ते माजी खासदार दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दत्ता मेघे यांच्यासोबतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमध्ये सुरू झाला आणि सध्या ते भाजपचे मंत्री आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघातून ते २०१४, २०१९ व २०२४ मध्ये विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक हे ठाणे येथील ओवळा माजिवडा विधानसभेचे आमदार आहेत. ते २००९, २०१४, २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर ED ची कारवाई झाली होती आणि त्यावेळी ते प्रकाशझोतात आले होते. त्यांचा राजकीय प्रवास आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आणि शिवसेना फुटल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्याचे बोलले जाते.

भरत गोगावले

भरत गोगावले हे २००९, २०१४, २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले होते. मागील सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते. विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात होती. एकनाथ शिंदे यांचे कोकणातील एकनिष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आले असे बोलले जाते.

प्रकाश आबिटकर

प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते २०१४, २०१९ व २०२४ मध्ये सलग तीन वेळा निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेमधून सुरु झाला आणि सध्या ते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत.

आशिष जयस्वाल

आशिष जयस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. १९९९, २००४, २००९, २०१९ व २०२४ या पाच वेळा ते निवडून आले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेमधून सुरु झाला आणि सध्या ते शिवसेनेचे मंत्री आहेत. २०१९ मध्ये महायुतीच्या उमेदवारीसाठी भाजपने उमेदवार दिला होता आणि आशिष जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व विजयी झाले. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्याचे बोलले जाते.

योगेश कदम

योगेश कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आहेत. रामदास कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्यांना नेहमी फायदा होतो. योगेश कदम हे २०१४, २०१९ व २०२४ मध्ये सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या वडिलांसोबत शिवसेनेत राजकीय प्रवास सुरू केला आणि सध्या ते शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत.

इंद्रनील नाईक

इंद्रनील नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा मोठा वारसा आहे. इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली. २०१९ व २०२४ विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. ते वसंतराव नाईक यांचे पुतणे आणि माजी आमदार मनोहर नाईक यांचे पुत्र आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top